नाशिक

मतदानासाठी मतदान कार्ड नसले तरी चिंता नाही

12 प्रकारचे पुरावे ग्राह्य धरणार; मतदान केंद्रात मोबाइल नेण्यास बंदी

निफाड : विशेष प्रतिनिधी
तालुक्यातील ओझर व पिंपळगाव बसवंत येथे 2 डिसेंबरला नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन निफाडचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे. मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असून, त्यापैकी कोणताही एक मूळ पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती पिंपळगाव बसवंत व ओझर नगरपरिषद निवडणूक अधिकार्‍यांनी दिली. मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही सांगण्यात आले
आहे.
मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. यामध्ये आधार कार्ड, मनरेगाअंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र (जॉब कार्ड), बँक किंवा टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), स्थायी खाते क्रमांक (पॅनकार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्ती वेतनविषयक कागदपत्रे, केंद्र अथवा राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचार्‍यांना दिलेले छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र या 12 पुराव्यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रात मोबाइलला बंदी
मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयता भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात तसेच मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास बंदी घालण्याचे आदेश संबंधित प्रशासनाने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदानाची गोपनीयता भंग होऊ नये, यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये. मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
-शशिकांत मंगरुळे, प्रांताधिकारी, निफाड तथा निवडणूक निर्णय अधिकारी पिंपळगाव (ब.)

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गावकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, 1 वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago