प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील अकृषी विद्यापीठय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात 2 फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच 14 फेब्रुवारी रोजी निदर्शने, 15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे, 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, तर 20 फेब्रुवारी रोजी सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयाचे बेमुदत बंद अशी आंदोलनाची रूपरेषा असल्याचे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभूवन यांनी दिली . यावेळी दिलीप बोंदर, रमेश पवार, श्री.खैरनार, डॉ.हेमंत भावसार, श्री. धोंडोपंत गवळी आदी उपस्थित होते.
यापुर्वी 18 डिसेंबर 2021 रोजी शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मागण्यासंदर्भात 11 दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर तात्कालिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कर्मचार्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केवळ चर्चा व आश्वासनाशिवाय काहीच होऊ शकले नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचार्यांमध्ये असंतोष असल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.