शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा  आंदोलनाचा इशारा


प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची मागणी
नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील अकृषी विद्यापीठय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी विविध प्रलंबित प्रश्‍नांच्या सोडवणुकीच्या संदर्भात 2 फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. तसेच 14 फेब्रुवारी रोजी निदर्शने, 15 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे, 16 फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप, तर 20 फेब्रुवारी रोजी सर्व अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयाचे बेमुदत बंद अशी आंदोलनाची रूपरेषा असल्याचे महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभूवन यांनी दिली . यावेळी दिलीप बोंदर, रमेश पवार, श्री.खैरनार, डॉ.हेमंत भावसार, श्री. धोंडोपंत गवळी आदी उपस्थित होते.
यापुर्वी 18 डिसेंबर 2021 रोजी शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी मागण्यासंदर्भात 11 दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर तात्कालिन उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र केवळ चर्चा व आश्‍वासनाशिवाय काहीच होऊ शकले नसल्याने शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांमध्ये असंतोष असल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Ashvini Pande

Recent Posts

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी

अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ   सिडको।…

3 days ago

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म आर्ट : व्हिडीओ पहिला का?

सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…

4 days ago

लाचलुचपतच्या पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराने ठोकली धूम या ठिकाणी घडली घटना

पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…

4 days ago

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार

मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…

4 days ago

मी रमी खेळत नव्हतो, विषय विनाकारण लांबवला..राजीनामा देण्यासारखे घडलंय तरी काय?माणिक कोकाटे स्पष्टच बोलले

नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…

4 days ago

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला

जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…

5 days ago