आता माझी पाळी , मीच देते टाळी!

गैरसमज दूर करण्यासाठी अनोखा कार्यक्रम

नाशिक: प्रतिनिधी
महिलांच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग असलेल्या मासिक पाळी विषयी आजही मनमोकळेपणाने बोलण्याचे टाळण्यात येते. मासिक पाळीबद्दल महिलांना देखील समाजात याविषयावर चर्चा करताना संकोच वाटतो. मासिक पाळीबाबत आजही अनेक अंधश्रध्दा रूढ झालेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी देवगाव आदिवासी आश्रम शाळेतही मासिक पाळीच्या काळात वृक्षारोपण केले तर झाड मरेल असे शिक्षकाने सांगितल्याचा आरोप मुलींने केला होता. मात्र अहवालातून तो आरोप खोटे असल्योच सिध्द झाले. मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आज दि.4 रोजी मासिक पाळी महोत्सव होणार आहे.
काळानुरूप मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील तुच्छतेची बाब नसून गौरवाची बाब आहे याची जाणीव करुन देण्याबरोबरच समाजाला नवीन दिशा देण्यासाठी अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांनी त्यांच्या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आल्याच्या निमित्ताने मासिक पाळी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी याविषयवार व्याख्यान ,चर्चासत्र,गाणी लघुपट,पुस्तक व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जाणार आहे. हा कार्यक्रम आज दुपारी 12 वाजता सुर्या हॉटेल येथे आयोजित करण्यात आला आहे.
पूर्वी मुलीना पहिल्यांदा पाळी आल्यानंतर जवळच्या आप्तेष्टांना बोलवत सुहासिनी महिलाकडून ओटी भरत मुलींचे कोड कौतुक केले जात होते.तसेच तिला नवीन कपडे घेतले जात असत. गोड जेवण देण्यात येत होते. या कार्यक्रमात गाणे म्हणत फुगड्या खेळत आनंद साजरा केला जात होता. त्यातून मुलीमध्ये झालेला शारिरीक बदल तिला आनंदाने स्वीकारता यावा तसेच नातेवाइकांना आपली मुलगी विवाह योग्य झाल्याची माहिती देणे हा हेतू या कार्यक्रमाचा होता. मात्र कालांतराने ही प्रथा बंद झाली.

स्त्रीला समाजात दुय्यम ठरविले आहे.तिच्यावर पुरुषांनी अनेक बंधने लादली आहे.तसे तिला मासिक पाळीत तीन – चार दिवस जखडून ठेवले जाते. मासिक पाळी बाबत अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत. त्या दुर करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.त्याला आम्ही आता कृतीची जोड देत आहे
-कृष्णा चांदगुडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *