एक कोटीच्या निधीतून पाच एकर जागेवर मिळणार विविध सुविधा
येवला : प्रतिनिधी
पैठणी, शिवसृष्टी, मुक्तिभूमीनंतर आता नमो उद्यान येवल्याचे आकर्षण ठरणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांची संकल्पना आणि नेतृत्वात हे उद्यान विकसित केले जाणार आहे. या उद्यानासाठी राज्य सरकारने एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.
येवला शहरातील नागरिकांना एक उत्कृष्ट दर्जाचे मनोरंजन केंद्र निर्माण व्हावे म्हणून नमो उद्यान साकारले जाईल, असे महायुतीच्या वचननाम्यामध्ये नमूद केले आहे. नमो उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, आकर्षक बागा व पाण्याचे फवारे बसविण्यात येणार आहेत. दर्जेदार उद्यान, हरित परिसर, विश्रांती व फिरण्यासाठी सुविधा या उद्यानात उपलब्ध होईल. हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने येवला शहरवासीयांना फायदा होईल.
निसर्ग, संस्कृती, आरोग्य आणि आधुनिक सुविधा यांचा सुंदर समन्वय असलेले नमो उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास आमदार पंकज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. नमो उद्यानासाठी सध्या जागेची निश्चिती केली जात आहे. किमान पाच एकर परिसरावर हे उद्यान साकारण्याचे नियोजन केले आहे.
नामांकित वास्तुविशारदाकडून या उद्यानाचे प्रतिरूप तयार केले जाईल. या उद्यानासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे नाशिक जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हे उद्यान वैशिष्ट्यपूर्ण ठरेल, असा प्रयत्न असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे.
नमो उद्यानाची वैशिष्ट्ये
अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक, आकर्षक ग्रेनाइट, कॉबेल स्टोन, नैसर्गिक रेड क्ले ब्रिक्स, डेकोरेटीव स्ट्रीट लाइट्स व स्पीकर प्रणाली. ग्रीन जिम, खुल्या हवेत व्यायामासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र जिम. लहान मुलांसाठी किड्स प्ले एरिया. बालकांच्या सुरक्षिततेसाठी ईपीडीएम फ्लोअरिंग. अम्फिथिएटर. शिल्प कलेचे विविध नमुने. ओपन ऑडिटोरियम. सुरक्षित आणि आधुनिक व्यवस्था. रोलर हॉकी ग्राउंड. बास्केटबॉल आणि टेनिस कोर्ट्स. उच्च गुणवत्ता पॉलियुरेथेन फ्लोरिंग. योग आणि ध्यानझोन शांत व हिरवळीत विसाव्याची जागा. बांबूची पक्षी घरटी, चिमण्या व विविध पक्ष्यांसाठी नैसर्गिक निवासस्थाने, रेन वॉटर
हार्वेस्टिंग. सोलर लाइट्स. पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत कंपोस्ट युनिट.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…