ञ्यंबकनगरी हरिनामाने दुमदुमली

ञ्यंबकनगरी हरिनामाने दुमदुमली

ञ्यंबकेश्वर

ञ्यंबक नगरी हरिनामाने दुमदुमली आहे.सायंकाळ पर्यंत 500 पेक्षा जास्त दिंडया शहरात दाखल झाल्या आहेत.यावर्षी वारक-यांची संख्या प्रत्येक दिंडीत अधिक दिसून येत आहे. युवकांचा सहभाग लक्षणीय आहे.दिंडया थांबण्यासाठी मुक्कामाच्या जागा डोंगरावर पोहाचल्या आहेत.ञ्यंबक नगर पालिका प्रत्येक दिंडीस पाण्याचा टँकर मागणी प्रमाणे पाठवत आहे मात्र दिंडी थांबलेल्या ठिकाणावर जाण्यास रस्ता मिळणे दुरापास्त झाले आहे.दिंडयांची संख्या वाढल्याने एकापाठोपाठ एक दिंडी येत आहे.ञ्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी दिंडीतील रथांची रांग लागलेली होती.मंदिर प्रांगणात तर वैष्णवांचा मेळा अनुभवण्यास येत आहे.संत निवृत्तीनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊन मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचण्याची लगबग सायंकाळ पर्यंत दिसून येत होती.व्यवसायिकांच्या दुतर्फा गर्दीतून वाट काढतांना दिंडीसोबत असलेले रथ आणि वारक-यांची दमछाक होत आहे.ञ्यंबक नगर परिषदेने दुतर्फा व्यावसायिक गाळे आखले असून ठेकेदारीने ते 10 लाख 60 हजारांना दिले आहेत.त्यामुळे रस्ते संकुचीत झाले आहेत.

महापूजा कोणाच्या हस्ते? पूजा जास्त लांबवू नका.

महापूजा कोण करणार याबाबत निवृत्तीनाथ संस्थानच्या विश्वस्तांमध्ये सायंकाळ पर्यंत संभ्रमावस्था होती.काही विश्वस्तांनी विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता असल्याने उपजिल्हाधिकारी शाम गोसावी पूजा करणार असे प्रसिध्दीस दिले तर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी पालक मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महापूजा होणार असल्याचे ठामपणे सांगीतले.दशमीच्या रात्री बारा वाजता विश्वस्त मंडळाची पूजा असते तर पहाटे चार वाजेच्या सुमारास ञ्यंबक नगर पालिकेची महापूजा असते.यावर्षी नगर पालिकेवर प्रशासक आहेत.दरम्यान विश्वस्तांची आणि शासकीय महापूजा होते तेव्हा दोन तास दर्शनबारी थांबवण्यात येते.वारकरी थंडीत रांगेत बसून घेतात.त्यासाठी या महापूजा फार वेळ लांबविण्यात येवू नये अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.

नगर पालिका सभागृहात वॉररूम

ञ्यंबक नगर पालिका प्रशासनाने यावर्षी सभागृहात वॉररूम उभारला आहे.संपूर्ण शहरात 32 सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यांचे थेट प्रक्षेपण सभागृहात लावलेल्या पडद्यावर होत आहे.येथे बसलेले कर्मचारी नगरसेवक सर्व परेस्थितीवर नजर ठेवून आहेत.शहरात पब्लीक अनाउन्समेंट सीस्टीम बसविण्यात आली आहे.पडद्यावर जेथे गर्दी झालेली दिसते त्यांना तातडीने जाहीर सुचना दिली जाते.तातडीने तेथे उपाययोजना करण्यात येत आहेत.

स्वागताचे बॅनर उचलले हजारोंचा खर्च पाण्यात

यात्रोत्सवात पुढारी स्वागताचे बॅनर लावत असतात.संत गजानन महाराज संस्थान पासून ते जुने बस स्थानक पर्यंत रस्त्याच्या मधोमध माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचे जवळपास 100 बॅनर उभे करण्यात आले होते.मात्र परवानगी घेतलेली नाही तसेच आचारसंहिता आहे म्हणून ञ्यंबक नगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सर्व बॅनर उतरवून ट्रक्टरमध्ये टाकून घेऊन गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *