नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर
पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून गळा चिरल्याने त्याचा मृत्यू झाला ची घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू धोत्रे (२२, चारन वाडी, देवळाली कॅम्प) हा युवक साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक जी. जे. १५ डी. एस.८३४१ या क्रमांकाच्या गाडीहून पाथर्डीगावं ते देवळाली कॅम्प या रस्त्याने जात असतांना पाथर्डी गावाच्या चौफुली ओलांडून जात असतांना पतंगाचा मांजा गाळ्यात अडकल्याने त्याचा गळा चिरला गेला.यावेळी अधीक रक्तश्राव होतं असल्याचे बघून काही नागरिकांनी त्यास उपचारासाठी तात्काळ एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले.
यावेळी कर्तव्यवर असणारे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी देखिल क्षणाचाही विलंब न करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याबाबईकडे लक्ष देत पुढील हालचालीना वेग दिला.मात्र अधीक रक्त श्राव झाला असल्याने व मांजमुळे खोलवर गळा चिरला गेला असल्याने खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले.
सोनू ला जिल्हा शासकीय रुग्णालयात उवचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले असून याबाबत इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *