नाशिक

अरे संसार संसार ते जागर शिवबाचा!

मराठी बोलींच्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक ः प्रतिनिधी
चौथे विश्व मराठी संमेलन नाशिक येथे होत आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला काल महाकवी कालिदास कलामंदिरात मराठी बोलींचा महोत्सव पार पडला. या महोत्सवात ‘अरे संसार संसार’पासून ते ‘जागर शिवबा’चापर्यंत बोलीभाषेतील कार्यक्रम सादर करण्यात आले. या महोत्सवास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
चौथे विश्व मराठी संमेलनाच्या पार्श्वभूमीवर काल सकाळी बोलीभाषांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. जळगाव येथील परिवर्तन संस्थेने शंभू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहिणाबाईंची गाणी व कविता यावर आधारित ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद देत ‘वन्स मोअर’ची मागणी केली. या कार्यक्रमातून अहिराणी गीतांचे दर्शन घडविण्यात आले. तसेच श्री. पाटील यांनी जीवनात बोलीभाषेचे महत्त्व विशद केले.
बोहाडा नृत्य प्रकार नाशिकचे शाहीर प्रवीण जाधव आणि सहकार्‍यांनी सादर केला.
पुष्पा ठाकूर, राणी कुमावत, माणिक कुमावत आणि सहकार्‍यांनी अहिराणी गीते, तर विदर्भातील नाट्य प्रकार असलेला ‘झाडीपट्टी’ हा प्रकार नरेश गडेकर व सहकार्‍यांनी सादर केला. विशाल शिंगाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी ‘आराधी’ लोकनृत्य आणि लोकगीते सादर केली. अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा, धाराशिव निर्मित आराधी लोकनृत्य आणि लोकगीतांमध्ये श्रीकृष्ण गीत, वासुदेवाचे पहाटेचे भक्तिगीत, विठू माउली गीत, खंडोबाचा जागर, वाघ्या मुरळी गीत, देवीचा जागर आदी गीते सादर केली.
प्रवीण जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, बालपण, विविध गुणांचा व कार्याचा पैलू दाखवणारे पोवाडा, गीत सादर केले.
या कार्यक्रमांना दिवसभर उपस्थित राहून नाशिककरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Oh world, world, the awakening of Shiva!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago