इंधन पुरवठा होणार सुरळीत, टँकर चालकांचा संप मागे
मनमाड : आमिन शेख
पालक मंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मध्यस्थीने ट्रक व टँकर चालकांचा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे आता इंधन पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पानेवाडी येथे दोन तास बैठक करून ट्रान्सपोर्टरशी यशस्वी चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला . ट्रक चालकांच्या काही अडचणी होत्या त्या ऐकून घेत आम्ही केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करतो असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. त्यानंतर संप मागे घेण्यात आला.काही वेळातच इंधन कंपनीतून इंधन पुरवठा सुरु करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कालपासून सुरू असलेला टँकर ट्रक चालकांचा संप अखेर मिटला असुन आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मनमाडला येऊन पानेवाडी इंधन प्रकल्पात चर्चा केली ट्रान्सपोर्टर व चालकांसोबत चर्चा करून त्यांच्या अडीअडचणीं जाणून घेतल्या . आम्ही लवकरच केंद्राकडे तुमच्या अडीअडचणी सांगून त्यावर तोडगा काढू असे सांगितले अखेर ट्रान्सपोर्टर व चालकांनी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन संप मागे घेतला आहे.
नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये
काही पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नाही अनेक ठिकाणी पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आता काही वेळातच पेट्रोल डिझेलचा सुरळीत पुरवठा सुरू होईल ज्या पंपावर पेट्रोल नाही त्या ठिकाणी पेट्रोल पोहोचवले जाईल नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…