नाशिक : वार्ताहर
शहरात सध्या दुचाकी सह घरफोडीच्या चोरीच्या घटनामध्ये वाढ झालेली आहे. त्याच पेट्रोल डिझेल, सह पाम तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणत वाढ झालेली असताना चोरट्यानी चक्क किराणा दुकान फोडून 4 लाख 75 हजार 580 रुपये किमतीचे तेल चोरुन नेली आहे. सदर घटना जे एम टेडर्स होलसेल किराणा दुकाना शरदचंद्र मार्केट पंचवटी नाशिक येथे घडली आहे. 10 ते 11 मे च्या दरम्यान दुकानातून 2 लाख 39 हजर 250 रुपयांचे मुरली सोयाबीन गोडेतेल 15 डबे, 63 हजर किमतीचे मुरली गोडेतेल चे 25 डबे, जेमिनी सर्नफॉअर 15 लिटर 7 डबे 21 हजर 350 रुपये, 20 हजार 400 चे मुरली सोयाबीन चे 28 कॅन , मुरली सोयाबीनचे 320 पॅकेट 32 बॉक्स 52 हजर 500, 12 हजर 960 साबुदाणा चे 30 किलो वजनाचे सहा कट्टे ,10 हजर रोख असा ऐवज चोरुन नेला.याप्रकरणी जितेंद्र मागिलाल भंडारी (वय 39 रा.बालाजी विहार अशोक स्थभ) यांनी पंचवटी पोलिसात फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरट्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी पी खैरनार करत आहे
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…