नाशिक : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वृद्ध साहित्यिक कलावंत योजना राबविण्यात येत असून , या योजनेंतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवर कलावंतांना मानधन अदा केले जाते . या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील वृद्ध साहित्यिक कलावंतांनी ३० जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत , असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे . प्रसिद्धिपत्रकात नमूद केल्यानुसार , इच्छुक कलावंतांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर अर्जाचा नमुना पंचायत समितीच्या या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे . सदर अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा समाजकल्याण अधिकारी , जिल्हा परिषद नाशिक या कार्यालयात शासन निर्णयातील अटी – शर्तीनुसार मानधनासाठीचा अर्ज ३० जून २०२२ पर्यंत आपण राहत असलेल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामार्फत सादर सादर करावा , अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री . पाटील यांनी दिली .