तिसऱ्या मजल्यावरून पडून 72 वर्षाच्या वृध्देचा मृत्यू
सातपूर: प्रतिनिधी
सातपूर पोलिस स्टेशन हद्देतील खांदवे मळा परिसरातील स्वागत सिम्फनी येथील अपार्टमेंटमधून तिसऱ्या मजल्यावरून पडून एका 72 वर्षाच्या वृध्देचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर आपल्या नातेवाईकां बरोबर राहणाऱ्या मंगला दत्तात्रय दळवी बाल्कनीत
उभ्या असताना तोल जाऊन खाली पडल्याने डोक्याला व हाताला गंभीर इजा झाली व या घटनेत मंगला दत्तात्रय दळवी यांचा मृत्यू झाला आहे या घटनेने दळवी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटना स्थळी वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र चव्हाण यांच्या सह पोलिस कर्मचारी हजर झाले होते. मृत वृध्देला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आसता डाक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले आहे. घटनेच्या ठिकाणी घराला जाळी नसल्यामुळे हा प्रकार घडला असावा असे नागरिकांचे म्हनणे आहे.
अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बेंडकुळे करित आहे