नाशिक

नाशिक पदवीधरचा गुलाल कोणावर पडणार

 

तांबे की पाटील आज फैसला

नाशिक : प्रतिनिधी

नाशिक पदवीधर उत्कंठावर्धक निवडणुकीचा निकाल गुरूवार (दि.2) रोजी जाहीर होणार आहे. सैय्यद पिंप्रि येथे असलेल्या गोदामात कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी केली जाणार आहे. नाशिक पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान झाले. एकूण 1 लाख 29 हजार 546 पदवीधरांनी मतदान केले. दरम्यान कमी मतदानाचा फायदा कोणाला अन तोटाला कोणाला हे आज गुरवार (दि.2) निकालावरुन समोर येणार आहे. नाशिक विभागच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या पदवीधर निवडणुकीत कोणाच्या खांद्यावर गुलाल पडणार, याचे उत्तर आज मिळणार आहे.

दरम्यान ही निवडणूक तांबे कुटुंबासाठी प्रतिष्ठेची झालेली आहे. तर महाविकास आघाडीसाठी तेवढीच महत्वाची ठरणार आहे. कॉंग्रेस पक्षाला लांब करुन सत्यजित तांबे यांनी ऐनवेळेस अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आश्चर्याचा धक्का दिला. विशेष म्हणजे तीन वेळेसचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या पुत्रासाठी माघार घेत त्यांच्यासाठी नाशिक विभागात पदवीधरांच्या गाठीभेटी घेऊन जोरदार काम करताना दिसून आले. नाशिक पदवीधर निवडणूक सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगत आली. उमेदवारी देउनही ती नाकारुन पक्षाला तोंडघशी पाडल्याची भावना कॉंग्रेस नेत्यांमध्ये होती. विशेषत: पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावरुन तांबे पिता-पुत्रांवर सतत आरोप केल्याचे दिसून आले. पटोले यांनी तांबे यांना शह देण्यासाठी नाशिकमध्ये ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासाठी मार्गदर्शन मेळवा घेतला. तिकडे आपली उमेदवारी अपक्षच असल्याचे सत्यजित तांबे वारंवार सांगताना दिसले यावर ते अद्यापही ठामच राहिले. ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या पाटील यांच्याकडील यंत्रणा शेवटच्या एक दोन दिवसात कमी पडताना दिसून आले. त्याचा फायदा कदाचित तांबे यांना होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. पदवीधरसाठी भाजपची जबरदस्त खेळी होती, ती अनेकांच्या समजण्यापलीकडील होती. जेव्हा तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी भाजपने केलेल्या प्लॅनिंगचा उद्देश विरोधकांना समजला. सक्षम उमेदवार असतानाही तो न देता अपक्ष असलेल्या तांबे यांच्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत असल्याचे सांगितले जात होते. एकप्रकारे पडद्यामागून भाजप सत्यजित तांबे यांच्याकरिता सुत्रे हालवित होती. भाजपच्या वरिष्ठांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत तांबेसाठी काम करण्याच्या सूचना शेवटच्या दिवशी केल्या. म्हणूनच नाशिक शहरासह विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवर तांबे दिसत होते. एक ते दोन महिन्यांपासून नाशिक पदवीधरसाठी आखणी सुरु होती. 30 जानेवारी मतदान पार पडल्यानंतर आता नाशिक विभागच नव्हे तर राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. निवडणुकीत सोळा उमेदवारांमध्ये अपक्ष सत्यजित तांबे, महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील, स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार व वंचितचे रतन बनसोडे आदी प्रमुख चेहरे निवडणुकीच्या रिंगणात होते. यात तांबे विरुद्ध पाटील यांच्यात प्रमुख लढत झाल्याचे बोलले जात आहे. परंतु स्वराज्य संघटनेचे सुरेश पवार हे किती मते खेचतात अन ते कोणाचा खेळ बिघडवू शकतील का, हे देखील आजच्या निकालावरुन समजणार आहे. या निवडणुक निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असून अनेकांच्या नजरा आज जाहीर होणार्या निकालाकडे लागल्या आहेत.

तांबेचे अखेरपर्यंत टीकेकडे दूर्लक्षच

कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. सुधीर तांबे व सत्यजित तांबे यांच्यावर वारंवार टीका केली. उमेदवारी अर्ज न भरल्याने तांबे यांचे निलंबनही करण्यात आले. यावर तांबे पिता-पुत्रांकडून काहीही प्रतिउत्तर देण्यात आले नाही. पटोले यांच्याकडून तांबे यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले. मात्र सत्यजित तांबे यांनी कुठेही न डगमगता त्यांच्या टीकेकडे मतदारापर्यंत सोयीस्करपणे दूर्लक्ष करणेच पसंत केले.

Ashvini Pande

Recent Posts

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी

मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…

1 day ago

नायलॉन मांजाने घेतला युवकाचा बळी

इंदिरानगर :  वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…

1 day ago

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी

सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…

1 day ago

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद

लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…

2 days ago

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५’चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा

नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…

3 days ago

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा

ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको :  विशेष प्रतिनिधी असे…

6 days ago