श्रमिकनगरला अपघातात एकजण जागीच ठार

 

 

प्रतिनिधी : सिध्दार्थ लोखंडे

 

सातपूरच्या श्रमिकनगर येथील कडेपठार रोडवर काल ( रविवार) रात्री 8 ते 8:30 च्या सुमारास नामदेव रामदास चौधरी वय 39 (रा.म्हसरुळ,पंचवटी) हे जात असताना  अज्ञात वाहनाने ठोस मारल्यामुळे डोक्यास गंभीर दुखापत होऊन इजा झाल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.याविषयी पुढील तपास सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक केदारे हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *