नाशिक

लग्नाचे आमिष दाखवत एकीवर चार वर्षे अत्याचार, साखरपुडा मात्र दुसरीशी

पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल

सिडको:  विशेष प्रतिनिधी :-लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांच्या कालावधीत युवतीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या पुण्यातील तरुणाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात पोस्कोसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तरुणाचा एप्रिलमध्ये साखरपुडा झाल्याचे समजल्यावर संबंधित तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्या भावनांशी खेळ करत धमकी देण्यास सुरुवात केली.

या प्रकरणातील आरोपी आकाश ताजणे (रा. कर्वेनगर, पुणे; मूळगाव – शेकईवाडी, ताजणे मळा, ता. अकोले, जि. अहमदनगर) याने २६ फेब्रुवारी २०२१ पासून एप्रिल २०२५ दरम्यान फिर्यादी युवतीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. तिने नाशिकच्या कॉलेज रोडवर, त्र्यंबकेश्वर रोडवरील हॉटेल आणि पुण्यातील डेक्कन परिसरात घडलेल्या प्रकारांची माहिती पोलिसांना दिली आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी आकाशचा साखरपुडा झाल्याचे समजल्यावर, पीडितेने त्याच्याशी संपर्क केला असता, त्याने तिचा फोन उचलणे बंद केले. इतकंच नव्हे, तर फोनवर “माझं लग्न मोडलं तर तुझंही लग्न मोडीन” अशी धमकी देत भावनिक आणि मानसिक छळ केला.या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रौंदळे हे करत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान

जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर   उपचार सुरू मोखाडा:   …

2 hours ago

आधी प्रेम… मग लिव्ह इन अन नंतर …

आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…

6 hours ago

दिंडोरी जवळ भीषण अपघातात सात जण ठार

  दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…

12 hours ago

प्रेम अन साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी… प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले…

साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…

2 days ago

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे

नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…

2 days ago

दहापट पैसे कमवायला गेली…खेळण्याचे पैसे घरी घेऊन आली

शहापूर: साजिद शेख पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन…

3 days ago