करायला गेलो एक

डॉ. किर्ती विकास वर्मा

 

 

*अनेक वेळा असे होते मनात काही औरच असते आणि घडत असते विपरित, अश्या वेळी कधी कधी आपला हशा होतो, कधी फजिती होते तर अनेकवेळा एखादा नवीन अनुभव मिळतो. म्हणजे घडलेली घटनेचा पडसाद आपल्यावर पडतो*

अशाच एक प्रसंग मी नवीन नवीन कार चालवायला शिकत होती. एका मोटार ड्राइविंग स्कूल मध्ये रीतसर क्लास ही लावला पण मला काही गाडी येईना. कारण त्यांच्या कडे अतिरिक्त क्लच आणि ब्रेक असतात. शिवाय गाडी चालतांना बर्‍या पैकी स्टेअरिंग वर त्यांचे नियंत्रण असते.

तर असा पंधरा दिवसाचा क्लास संपन्न झाला. पण माझा गाडी चालविण्याचा आत्मविश्वास मात्र वाढला नाही. त्यामुळे मी गाडी काही काढायची नाही. असेच काही दिवस गेले.. मी ही दुखी झाली की एवढ्या गोष्टींमध्ये आपण तरबेज आहोत पण ही गोष्ट काही हाती येईना. अचानक एक दिवस मला असे कळले की वैयक्तिक गाडी चालक आहे जे गाडी चालवायला शिकवितात. ऐकून आनंद वाटला. स्वप्नपूर्ती होणार आता आपली, मी लगेच संबंधित व्यक्तीला फोन केला, आणि त्याची आगाऊ फी सुद्धा देवून टाकली. दुसर्‍या दिवशी संध्याकाळी ठरल्यानूसार तो ड्रायवर आला देखील मला त्याच्या कार मधून एक चक्कर मारून आणली आणि प्राथमिक माहिती दिली. आणि माझ्या मनात आशा निर्माण झाली की आपण आता नक्कीच गाडी शिकणार हे स्वप्न बघत झोपी गेले. दुसर्‍या दिवशी मला सकाळी त्या ड्रायवरचा फोन आला आणि त्याने उर्वरित रक्कम मागितली. मी उत्साहाच्या भरात त्याला सगळी फी देवून टाकली. आणि संध्याकाळची वाट पाहू लागली.

पण हे काय संध्याकाळ झाली तरी त्याचा येण्याचा काही पत्ता लागेना. त्याचा फोन ही बंद येवू लागला.

मला वाटले काही अडचण असेल येतील उद्या म्हणून मी त्या दिवशी जास्त लक्ष नाही दिले. पण परत दुसर्‍या दिवशी सुद्धा तेच.. लगातार दोन – तीन दिवस हेच व्हायला लागले. मग मात्र माझ्या मनात शंकेची पाल चुकली. आपण फसविले गेलो तर नाही ना असे वाटायला लागले. आणि ते खरे ठरले जवळपास आठ दिवस उलटले पण त्याचा काही येण्याचा पत्ता लागत नव्हता, मी देखील आशा सोडून दिली. पण आपले पैसे बुडाले ही खंत वाटत होती. शेवटी मी ठरवले पोलिसात तक्रार द्यायची कारण मी दिलेली रक्कम जरी कमी असली तरी अशी फसवणूक इतर लोकांची होवू नये म्हणून मला त्याला धडा शिकवावा वाटला. मी लेखी तक्रार पोलिसात दिली. त्याच्या मोबाईल नंबर आणि इतर माहिती वरून त्याचा शोध लागला. आणि मला धक्काच बसला,असाच एका व्यक्तीला कार शिकवित असतांना त्याचा एक्सीडेंट झाला आणि त्यात स्मृतिभ्रंश झाली. त्याला काही आठवत नव्हते, तो कोण, नातेवाईक कोण किंवा त्याने कोणाकडून पैसे घेतले आहे का? की त्याला कोणाचे द्यायचे आहे का? अनेक गोष्टी होत्या… पण तो रीता होता, अनभिन्न होता. त्याचा फोन सुद्धा फुटल्यामुळे बंद झाला होता. शेवटी हे सर्व जाणून मी रिपोर्ट देने टाळले. पण मला धडा मिळाला होता,की आपण कधी कधी घाई करतो निष्कर्षा पर्यन्त पोहचण्याची आणि वास्तव काही वेगळेच असते. ही कथा जरी काल्पनिक असली तरी एक संदेश देणारी आहे की अनेकदा आपण करायला जातो एक आणि घडते वेगळेच त्यामुळे जे समोर येते त्याचा सारासार विचार करायला पाहिजे तेव्हा कुठे आपल्याला नवीन अनुभुती होते. या कथेत मला नवीन अनुभव मिळाला हे नक्की!!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *