कांदा प्रश्र्नी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत कुठलाही तोडगा नाही.

कांदा प्रश्र्नी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा नाही.

लासलगाव:समीर पठाण

कांदा प्रश्नावर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्या प्रकरणी मंगळवारी जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवडक बाजार समित्यांचे सभापती,सचिव व नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.ही बैठक अवघ्या दहा मिनिटात संपन्न झाली मात्र या बैठकीतूनही कुठलाही तोडगा निघालेला नसल्याचे कळते.

भारताच्या विविध ठिकाणी बॉर्डरवर सुमारे २१ हजार टन कांदा अडकलेला आहे तो विदाऊट ड्युटी सरकारने सोडावा यानंतर आम्ही निर्णय घेणार असल्याची भूमिका या वेळी व्यापाऱ्यांनी घेतली आहे जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत लिलाव बंद राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे.

राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंढे आणि अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांचेशी लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दुरध्वनीवरून कांदा निर्यात शुल्क बाबत चर्चा करून सविस्तर माहिती दिली होती त्याअनुषंगाने जिल्ह्यातील निवडक बाजार समित्यांचे सभापती,सचिव व नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी यांची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे निर्देश कृषि मंत्री धनंजय मुंढे यांनी दिले होते

दरम्यान मंगळवारी देखील लासलगाव बाजार समितीच्या कांदा लिलाव आवारावर शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा लिलाव साठी आणला नाही त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.लासलगाव बाजार समिती सह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांचे देखील मोठे आर्थिक नुकसान होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *