लासलगाव। प्रतिनिधी
गेली कित्येक दिवस कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरू होती. अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.आत्ता गेल्या पंधरा दिवसापासून कुठेतरी कांद्याला थोडा फार भाव मिळत असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार असल्याने शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये आज सोमवारी लाक्षणिक बंद पाळावा असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कांद्याचे दर २ हजार रुपयांच्या पुढे गेले की हे दर कमी कसे करता येतील यासाठी केंद्र सरकार अतिशय तत्परतेने निर्यात शुल्क लादून किंवा निर्यात बंदी सारखे निर्णय घेऊन हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करत शेतकऱ्यांना हेतू पुरस्कार त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोप होळकर यांनी केला आहे. लाल कांद्याच्या बाबतीत देखील अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी राज्य सरकारने ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केले होते. ते अनुदान शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाही.
उन्हाळ कांदा सुरुवातीला बाजारात आल्यानंतर केवळ तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल दराने तो विक्री करावा लागला होता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे अवघड झालेले होते अशा परिस्थितीत चाळीत साठवलेला कांदा सध्या बाजारपेठेत विक्रीला आणला जात आहे याच कांद्याला १५०० ते १६०० भाव सध्या शेतकऱ्यांना मिळत असताना केंद्र सरकारने अत्यंत चुकीचा निर्णय घेऊन निर्यात शुल्क ४० टक्के पर्यंत वाढवल्याने आपोआपच निर्यातीला त्याचा फटका बसणार असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या बाजारभावावर होणार आहे.
शेतकरी हितासाठी बाजार समितीच्या सर्व घटकांनी यामध्ये व्यापारी व माथाडी कामगार, हमाल यांनी आपली एकजूट दाखवावी व सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लाक्षणिक बंद सोमवारी पाळावा असे आवाहन यावेळी जयदत्त होळकर यांनी केले आहे.
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…