उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सिन्नर बाजार समितीचा निर्णय; शेतकर्यांकडून समाधान
सिन्नर : प्रतिनिधी
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व व्यापार्यांची गैरसोय टाळण्यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याच्या लिलावाची वेळ सकाळी 10 वाजता करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे व सचिव विजय विखे यांनी दिली. सिन्नर मुख्य बाजारासोबतच नायगाव उपबाजारातही या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार सोमवार (दि.9) पासून सिन्नर मुख्य बाजार आवारात कांद्याचे लिलाव सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आले. लिलावाचे कामकाज दुपारी सुमारे 12.30 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आले. वाढत्या तापमानामुळे शेतकरी व व्यापार्यांना होणारा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. शेतकर्यांनी आपला कांदा शेतमाल सकाळी 10 वाजण्यापूर्वी बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती, उपसभापती, सचिव व संचालक मंडळाने केले आहे.
सिन्नर मुख्य बाजारात 122 वाहनांतून 2900 क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान 500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 1102 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 950 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. नायगाव उपबाजारात 25 वाहनांतून 400 क्विंटल कांद्याची आवक झाली. किमान दर 400, कमाल 1140 रुपये तर सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
निर्णयाचे स्वागत
शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत बाजार समितीने सकाळी 10 वाजता कांदा लिलाव सुरू करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच बाजार आवाराकडे येणार्या रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त केल्याने वाहतुकीची अडचणही कमी झाली आहे.
– अमोल पवार, शेतकरी सोनांबे.
Onion auction now at 10 am
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…