हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे रक्तदानात मागे
नाशिक ः प्रतिनिधी
एखाद्या रुग्णाला वेळेवर रक्तपुरवठा मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविता येतो.त्यामुळे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते.अनेकदा सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते.रक्तदान शिबिरांमध्ये पुरूषांचे प्रमाण अधिक असते.महिलांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही हिमोग्लोबीनची कमतरता आणि इतर कारणांमुळे रक्तदान करू शकत नाही.त्यामुळे रक्तदानात महिलांचे केवळ पाच टक्के प्रमाण आहे.
अपघात किंवा आजार,शस्त्रक्रियांवेळी तातडीने रक्त उपलब्ध होणे गरजेचे असते.त्याशिवाय रुग्णाचा रक्तगट जुळला तरच प्राण वाचू शकतात.त्यामुळे ब्लडबँकांमध्ये रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध ठेवावा लागतो.
महिलांमध्ये आहारासह मानसिक,शारीरीक होणारे बदल जीवनसत्वांचे प्रमाण कमी असणे त्याशिवाय मासिकपाळी,बाळंतपणात झालेला रक्तस्त्राव,झीज आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते.असे तज्ज्ञ सांगतात.त्यामुळे महिलांना इच्छा असूनही रक्तदान करता येत नाही.
महिलांना रक्तदान करण्याची इच्छा असल्यास रक्तातील हिमोग्लोबिन 12.5 टक्के असावे अशी प्राथमिक अट असते.मासिकपाळीतील दिवस सोडून इतर दिवशी रक्तदान करता येते.वयोगट 18 ते 60 वयोगटापर्यात रक्तदान करता येते.
रक्तदान शिबिरांची कमतरता
जिल्ह्यात एकूण 25 ते 30 रक्तपेढ्या आहेत.शहरात 13 ते 15 रक्तपेढ्या आहेत.कोरोनापासून रक्तदान शिबीरांना ब्रेक लागला होता.आता तुरळक शिबिरे होत असल्याने साठ्याचे यप्रमाण कमी झाले आहे.कोरोना अगोदर 150 ते 200 बॅग्ज संकलन होत होते.आता 15 ते 20 बॅग्ज जमा होत असल्याचे चित्र आहे.कोरोना काळात रक्तदान केले तर प्रतिकारशक्ती कमी होण्याची भितीमुळेे आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे प्रमाण कमी झाले होते.
असे वाढवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
. आहारामध्ये काळया मनुका, काले खजुर, सुकामेवा खारिक, शेंगदाणे, गुळ, राजगिरा
नाचणी हया पदार्थाचा समावेश आवश्यक आहे.
नाश्ताः सकाळच्या नाश्यातासह एक कप गाईचे दूध प्यावे. . सकाळचे जेवण:
हातसडीच्या तांदूळाचा भात + तुरीच्या डाळीचे वरण + एक चमचा गाईचे तूप + लिंबू
. कोशिंबीरीसाठी बीट गाजर मुळा टोमॅटो प्रामुख्याने वापरावे.
पालक मेथी माठ चाकवत आंबटचुका अळू या पालेभाज्यांचा वापर 3. वाढवावा.
दूधी भोपळा दोडके घोसाळी लाल भोपळा कारळे भेंडी गाजर
या फळभाज्यांचा वापर वाढवावा.
मूग मटकी चवळी हरभरे काळे चणे या कडधान्यांचा वापर वाढवावा.
आठवडयातून वेळा ज्वारी + बाजरी + नाचणी पिठ भाकरी असावी. . दुपारी वाजता रोज एक फळ खावे : डाळिंब सफरचंद अंजिर पैकी एक फळ खावे.
संध्याकाळी 6 वाजता : . मूठभर शेंगदाणे + गूळ
किंवा मूग + खारिक + खोबरे लाडू किंवा राजगिरा लाडू रोज एक खावा
किंवा नागली सत्व लाडू रोज एक खावा
. रात्रीच्या जेवणात मृगाच्या डाळिची खिचडी असावी.
. अन्न शिजवतांना गूळाचा वापर वाढवावा.
. स्वयंपाक बनविण्यासाठी लोखंडाची कढई तवा पळी वापरणे जास्त योग्य आहे.
गुळ ङ्गुटाणे,शेंगदाणे,पेर,खारीक,काळे ङ्गुटाणे,बीट,
रक्तदान केल्याचे ङ्गायदे
महिलांमध्ये कमीत कमी 12.5 हिमोग्लोबीन असायला हवे.मानसिक,शारिरीक तंदुरूस्त असल्यास रक्तदान करता येते. शरीरात एकुण अडीच लिटर रक्त असते.त्यातून 350 मिली रक्तदानद्वारे घेतले जाते.शरीराचे कार्य चालण्यासाठी दीड लिटर रक्ताची आवश्यकता असते.रक्तदान केल्यानंतर 24 तासात नवीन रक्त तयार होते.त्याचा ङ्गायदा रक्तदात्याला होतो.त्वचारोग,ऍसिडीटी,पोटाचे आजार कमी होतात.पांढर्या पेशींची कार्यक्षमता वाढते.
कोरोनामुळे नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली असल्याने रक्तदानासाठी पुढाकार घेतला जात नाही.परंतु अशी भिती बाळगूनये.
रक्तपेढ्या वाढल्या आहे.मागणी जास्त आणि साठा पुरेसा नसल्याने अडचणी येतात.
नॅब टेस्टेड रक्तपेढ्या
न्युक्लिक ऍसिड टेस्ट केल्या जाणार्या रक्तपेढ्यांमध्ये तपासणी केली जाते.त्यापैकी नाशिकमध्ये अर्पण येथे हि सुविधा आहे.चेन्नई,मुंबई,नाशिक याठिकाणी केली जाते.
प्रकाश थॅवर (अर्पण रक्तपेढी)
भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता,रक्तस्त्राव,शारीरिक तंदुरूस्ती योग्य प्रकारे ठेवली जात नसल्याने महिलांचे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे.
डॉ.सुजाता सोनवणे(जनकल्याण रक्तपेढी)