अवघ्या पाचशे रुपयांच्या लाचेसाठी तिघे एसीबी च्या जाळ्यात
नाशिक: प्रतिनिधी
लाचखोरीचे प्रमाण काही केल्या कमी होण्यास तयार नसून अवघ्या पाचशे
रुपयांच्या लाचेसाठी मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर खांडेकर, डेटा एन्ट्री ऑपरेटर विठोबा शेलार, एजनट दत्तू देवरे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे, जनरल मुक्तयर नोंदणी केलेला दस्त देण्यासाठी एजट दत्तू देवरे यांनी लाच मागितली, तर शेलार याने स्वीकारली, वरिष्ठ लिपिक खांडेकर यांनी सांगितले म्हणून ही लाच मागितली, त्यामुळे पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी, हवालदार सचिन गोसावी, गणेश निबालकर,चवणके ,पवार यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शन खाली ही कारवाई केली