नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी अखेर प्रा. डॉ. संजीव सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली. डॉ. सोनवणे हे सद्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र. कुलगुरु म्हणून कार्यरत होते. डॉ. सोनवणे हे मुक्त विद्यापीठाचे नववे कुलगुरु आहेत. सद्या डॉ. पाटील यांच्याकडे पदभार होता. वायूनंदन यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला होता. त्यानंतर कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.