उद्योगांसाठी ओपेक्स २३ चॅम्पियनशिप स्पर्धा

 

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटतर्फे आयोजन

नाशिक : प्रतिनिधी

भारतातील सर्व उद्योगांना त्यांचे आधुनिक, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प प्रदर्शित करण्याची संधी मिळण्यासाठी सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटतर्फे ओपेक्स २३ चॅम्पियनशिप या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक डॉ. वंदना सोनवणे यांनी येईल. पत्रकार परिषदेत दिली.

भारतातील उद्योगांमधील सिक्स सिग्मा, लीन सिक्स सिग्मा, साइबर फिजिकल सिस्टम, सायबर सिस्टम, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, प्रोसेस एक्सलन्स यासंदर्भातील सर्व उपक्रमाची आणि प्रकल्पाची नोंदणी करता येईल तसेच या सर्व बाबींचा किमान सहा महिन्यांचा सराव पूर्ण करून त्यापासून फायदा झाला असावा जेणेकरून याचा इतर उद्योजकांना फायदा होऊ शकेल.

या स्पर्धेमध्ये एका कंपनीचे कितीही उपक्रम सादर करण्यात येतील. मात्र, एका चमूमध्ये ३

सभासदांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेकरिता नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत २५ डिसेंबर २०२२ पर्यंत असून, सदरहू स्पर्धा (दि. ६ जानेवारी) सिम्बॉयसिसच्या नाशिक कॅम्पसमध्ये घेण्यात येईल. या स्पर्धेत विजेत्या गटाला ट्रॉफी आणि सहभागी स्पर्धकांना सिम्बॉयसिसतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची नाशिकस्थित ऑपरेशन मॅनेजमेंटची अग्रगण्य संस्था सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटच्या वतीने भारतात प्रथमच हा उपक्रम होणार असून, उद्योजकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहनही डॉ. सोनावणे यांनी केले. यावेळी सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल सरकार, डॉ. हर्षल सोनार, डॉ. शशांक कुमार, डॉ. सीमा घंगाळ, डॉ. संदीप शारदा, राजेश करजगी, मनीषा बोरसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *