नाशिक : वार्ताहर
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार डाँ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त
मुख्यमंत्री चषकांचे 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख योगेश म्हस्के यांनी चषकांचे आयोजन केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, स्विय सहाय्यक मुख्यमंत्री प्रभाकर काळे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख तथा ओ एस डी मुख्यमंत्री मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चषक संपन्न होणार आहे.
८ ते १२ फेब्रुवारी २०२३ गोल्फ कल्ब अनंत कान्हेरे मैदान नाशिक येथे चषंक आयोजित करण्यात आले आहेत.
या मुख्यमंत्री क्रिकेट चषक स्पर्धेच्या पोस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, सह संपर्क प्रमुख राजु लवटे, जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले , महानगर प्रमुख प्रविण तिदमे , डाँ किरण वाघ, मामा ठाकरे, दिगंबर नाडे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन समारंभ बुधवारी दि ८ फेब्रुवारी २०२३ सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.
पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारोह संपन्न होणार आहे.
१) प्रथम पारितोषिक ३ लाख ५६७ (पालकमंत्री दादा भुसे यांच्या वतीने )
२) व्दितीय पारितोषिक २ लाख ५६७ ( खासदार हेमंत गोडसे यांच्या वतीने )
३) तृतीय पारितोषिक १ लाख ५६७ (आमदार सुहास कांदे यांच्या वतीने )
४) चतृर्थ पारितोषिक ७५ हजार ५६७ ( बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या वतीने )
सर्वोत्कृष्ट फलदांज ११ हजार १११
सर्वोत्कृष्ट गोलदांज ११ हजार १११ मँन आँफ द मँच ५ हजार ५५५
विजेत्या संघाना पारितोषिक वितरण रविवारी दि १२ फेब्रुवारी २०२३ रोजी खासदार डाँ श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारतात व इतर राज्यातील संघ सहभाग नोंदविणार आहे.