हिवताप दिनानिमित्त जनजागृती मोहिमेचे आयोजन
नाशिक:
दरवर्षी जागतिक हिवताप दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. त्यानुसार या वर्षीही जिल्ह्यात व मनपा कार्यक्षेत्रात विशेष जनजागृतीपर मोहिमचे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. त्यात प्रभात फेरी, सायकल-दुचाकी रॅली, हिवताप माहिती विषयी प्रदर्शन, गर्दीची ठिकाणे जसे बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे फ्लेक्सद्वारे जाहिराती यांचा समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार व त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्य सेवक,सेविका, आशा वर्कर्स यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, अबेटिंग, जलद ताप सर्वेक्षण, गप्पीमासे सोडणे मोहिम, व्हेंट पाईपला जाळ्या लावणे, आरोग्य शिक्षण देणे अशा विविध माध्यमातून नागरिकांची जनजागृती करण्यात येणार आहे.
काय काळजी घ्यावी…
आपल्या घरात व आजुबाजुस पावसाचे पाणी साचु देवु नये, स्वच्छता ठेवावी.
पाणी साठे झाकुन ठेवावे.
आठवड्यातुन एक दिवस कोरडा पाळावा.
भंगार सामान, टायर्स याची वेळीच विल्हेवाट लावावी.
शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात.
झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडावेत.
कोणत्याही व्यक्तीला ताप, उलटी, मळमळ असा त्रास जाणवल्यास त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण रूग्णालयात जाऊन हिवाताप/ डेंगीसाठीची तपासणी
निशुल्क करण्यात येते, असेही जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांनी कळविले आहे.
अमेरिकेचा मोठा शत्रू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुमारे ७५ देशांवर लादलेल्या जबर आयात शुल्कामुळे…
नाशिक: प्रतिनिधी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर आज भाविकांची मोठी गर्दी उसळली होती, व्यवस्थापन यांच्या…
सिन्नर : प्रतिनिधी सिन्नर - शिर्डी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात…
सिन्नर : प्रतिनिधी शहरातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रोत्सवास शुक्रवारी (दि. 11) प्रारंभ होत आहे.…
सप्तशृंगगड ः वार्ताहर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तशृंगीदेवीचा चैत्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून म्हणजे मध्य…
पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे... नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल नाशिकरोड :…