ओझर येथे शॉक लागून मायलेकीचा करुण अंत
जावई ,दोन मुले थोडक्यात बचावली
ओझर : विशेष प्रतिनिधी
येथील दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा शॉक लागून मृत्यू झाला।. पत्नी अन् मुलीला डोक्यावर असलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.घरावरच्या गच्चीतील पेरू तोडत असताना हातातील रॉड हा हाय टेन्शन वायरला लागल्याने मीना हनुमंत सोनवणे ,आकांक्षा राहुल रणशूर या मायलेकिंचा जागीच मृत्यू झाला.तर पती राहुल रणशूर व त्यांच्या दोन बालकांना शॉक मुळे लांब फेकल्याने ते बालंबाल बचावले. सदर घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली पण गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता.ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगाव येथे पाठवले आहे.पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…