चित्रकला शिक्षकास सात वर्षांचा कारावास

 

नाशिक : वार्ताहर

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या चित्रकला शिक्षकास न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास व २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी अशोक रघुनाथ नागपुरे (वय ५७, रा. मिलेनियर पार्क, गजपंथ, म्हसरूळ) या शिक्षकाने विद्यार्थिनीच्या दुचाकीवर डबलसीट असताना फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. असाच अनुभव अन्य एका मैत्रिणीला आला असून, तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान वेळोवेळी घडला होता.  या विद्यार्थिनीने शिक्षकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३५४, ३५४ (अ), ५०६ व बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ च्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास करून जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले.  खटल्याचे कामकाज क्रमांक ३ च्या न्यायालयात चालून न्या.  एम. व्ही. भाटिया यांनी वरील शिक्षा ठोठावली. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. सुलभा सांगळे व रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *