नाशिक : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर पुन्हा दहशतवादी हल्ल्याने हादरले असून पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. धर्म विचारुन गोळ्या घातल्या.या क्रुर आणि अमानुष हाल्याचा नाशिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध करत शालिमार चौक नाशिक येथे आदोलंन करत संतप्त शिवसैनिकांनी पाकीस्थानच्या ध्वजाची होळी केली. शिवसेना,अंगीकृत संघटना पदाधिकारी वशिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.