पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्याने खोळंबा

 

नाशिक : प्रतिनिधी

कसारा स्टेशन जवळ मुंबईकडे जाणारी पंचवटी एक्सप्रेस ची कपलिंग तुटल्यामुळे प्रवाशांना खोळंबा झाला. आज सकाळी पंचवटी एक्सप्रेस कसारा जवळ आली असताना कपलिंग तुटली. त्यामुळे आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोको पायलट च्या लक्षात येताच गाडी थांबली. दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. यामुळे प्रवासी अडकून पडले  सकाळी ८. २५ ला ही घटना घडली.

पहा व्हीडिओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *