नाशिक : प्रतिनिधी
शहरातील पंचवटी परिसरासह काही पुरातन मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून, हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारची मंजुरी मिळाली की मंदिरांच्या डागडुजीसह तत्सम तरतुदींसाठी विशेष निधी
मिळणे अधिक सोपे होणार आहे. समितीच्या इतिवृत्तात हा विषय समाविष्ट करण्यात आला असून, १२ डिसेंबरला जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. बैठकीनंतर याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात येणार असून, सरकारची त्यास मंजुरी मिळाल्यास तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.