पांडव लेणी येथील घटना
इंदिरानगर |वार्ताहर | पांडव लेणी येथे पाय घसरून पडलेल्या पर्यटकाला व एका लहान मुलीला गिर्यारोहकांनी सुखरूप बाहेर काढले.तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले.
मुंबई येथील रहिवाशी असलेले साबियो सांचेस ( वय – ४० वर्षे ) लहान मुलीसोबत पांडवलेणी पाहण्यासाठी आले होते. पांडव लेणी चढत असताना अचानक तोल जाऊन लहान मुलीसह खाली पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. तर मुलीला किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांनी पोलीस कर्मचारी रवाना केले . गिर्यारोहकांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. गिर्यारोहक व स्पेशल स्ट्रेचरच्या साहाय्याने त्यांना पायथ्याशी आणण्यात आले. रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबडच्या फडोळ मळा परिसरात सिनेस्टाईल हाणामारी; दोन ते तीन जण जखमी पाहा व्हिडीओ सिडको।…
सिन्नर येथे चार लाख बेचाळीस हजार नऊशे स्क्वेअर फुटात साकारले अजित दादा पवार यांचे फार्म…
पथकाला पाहताच लाचखोर हवालदाराची धूम नाशिक : प्रतिनिधी घोटी पोलिस ठाण्यातील हवालदार राजाराम रुंजा डगळे…
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…