पाथर्डी फाटा येथे फटाके फोडण्याच्या वादातून युवकाचा खून
नाशिक: प्रतिनिधी
फटाके फोडण्याच्या वादातून पाथर्डी फाटा येथे एका युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे, गौरव आखाडे असे या युवकाचे नाव आहे, लक्ष्मी पूजन च्या दिवशी फटाके फोडण्यावरून शेजारच्याशी वाद झाला होता, पण काल रात्री 10 ते 12 युवक हातात कोयते, गज घेऊन आले आणि त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या गौरववर हल्ला केला, त्यात तो गंभीर जखमी झाला, त्याला रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला, याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.