खेडलेझुंगे येथे विजेच्या धक्क्याने मोर मृत्युमुखी.
लासलगाव:-समीर पठाण
खेडलेझुंगे (ता.निफाड) येथे विजेचा शॉक लागून मोराचा मृत्यू झाला.वन विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मोराला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की सुभाष घोटेकर हे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान शेताध्ये काम करण्यासाठी गेले असता त्यांना दिलीप घोटेकर यांच्या शेतात रोहित्रावरील ट्रान्सफ़ार्मवर राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आला.
सुभाष घोटेकर यांनी याची माहिती सतीश शिंदे आणि वनपाल भगवान जाधव दिली.त्यानुसार सतीश शिंदे यांनी तातडीने विद्युत पुरवठा बंद केला.वनपाल जाधव यांनी वनमजूर सादिक शेख आणि वाहन चालक सागर दुशिंग यांना घटनास्थळी तातडीने रवाना केले.वनविभागाचे कर्मचारी आल्यानंतर रोहित्रवरून मोराचे शव खाली घेण्यात आले.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरचे शव ताब्यात घेऊन निफाड येथल रोपवाटिके मध्ये दहन करण्यात आले.
यावेळी पक्षीप्रेमी व शेतकरी मोहन घोटेकर,सुभाष घोटेकर,संपत जाधव,योगेश तासकर,माधव घोटेकर, संदीप घोटेकर,कुणाल घोटेकर,गौरव घोटेकर,अभय घोटेकर,निर्भय घोटेकर,विष्णू घोटेकर,प्रदीप घोटेकर,वन मजूर सादिक शेख,वाहन चालक सागर दुशिंग आदींसह शेतकरी उपस्थित होते.