चोरीच्या पाच मोटारसायकल हस्तगत 

म्हसरूळ पोलिसांची कामगिरी

पंचवटी : वार्ताहर
मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीची उकल करण्यात म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून पाच गुन्ह्यांची उकल झाली आहे. यात एक लाख ६० हजारांच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
  म्हसरूळ पोलिसांच्या गोपनीय शाखेचे प्रशांत देवरे यांना मिळालेल्या हर्षल सुनील वनवे (रा. मखमलाबाद) यांच्या चोरीची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक पाटील, पोलिस नाईक वसावे, देवरे, सास्कर यांनी सापळा रचून आरोपीस मोटरसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सोनू खंडू पवार (रा अश्वमेध नगर, पेठ रोड), रोशन दशरथ गांगुर्डे (रा यशोदा नगर,पेठ रोड) यांच्याकडे देखील चोरीच्या मोटरसायकल असल्याचे सांगितलं. या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी
म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुधीर पाटील , विनायक अहिरे  तसेच हवालदार बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, पंकज चव्हाण यांनी सापळा रचून दोघा आरोपींना चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेण्यात आले. यात एकूण पाच मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *