तुळशीच्या बियांचा खाण्यात वापर करणे हे हल्ली ट्रेंडमध्ये आले आहे. तुळशीच्या बियांचा वापर हजारो वर्षांपासून संपूर्ण जगभरात केला जातो आहे. या बियांना सब्जा असेही नाव आहे. हा सब्जा प्रकृतीने थंड असल्याने याचा वापर उन्हाळ्यात करणे अत्यंत लाभदायक असते. तुळशीच्या बियांचे अनेक फायदे आहेत, परंतु सामान्य माणसाला त्याचे नीट ज्ञान नसल्याने तुळशीच्या बियांचा म्हणावा तसा वापर आपल्या आहारात केला जात नाही. हे तुळशीचे बी केवळ तुमच्या त्वचेसाठी किंवा केसांसाठीच नव्हे तर संपूर्ण शरीरासाठी गुणकारी आहे.
तुळशीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने चेहर्यावरच्या सुरकुत्या, वाढत्या वयानुसार येणारे डाग आणि कायमस्वरूपी डाग ह्यापासून सुटका होऊ शकते. मुरुमांचा त्रास बराच कमी होतो. चेहरा चमकायला लागतो.
तुळशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, त्यामुळे आपले केस वाढण्यास मदत होते आणि प्रदूषण किंवा रसायनामुळे केसांचे झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते.
तुळशीच्या बियांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळतो त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत चालण्यास मदत होते. याशिवाय तुळशीच्या बिया खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे जेवणाच्या मध्ये अरबट चरबट खायची इच्छा होत नाही आणि जास्त खाणे टाळते जाते. त्याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यासाठी होतो. तुळशीच्या बियांचा आपल्या आहारात नियमित वापर केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकच्या शक्यता कमी होतात.
तुळशीच्या बियांमध्ये पोटॅशियाम आढळते ज्यामुळे ते धमन्या आणि राक्तवाहिन्यांमधील ताण कमी होऊन, यामुळे हृदयाची कार्यप्रणाली सुरळीत चालते आणि हृदयरोगाला अटकाव होतो.तुळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे रेटिनासाठी एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते ज्यामुळे मोतीबिंदूची वाढ थांबवण्यासाठी मदत होते.
मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…