लासलगाव : प्रतिनिधी
देवगाव फाटा ते नैताळे रस्त्यावर रुई शिवारात शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीकअप गाडी व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर चार जण गंभीर झाले.जखमींमध्ये दोन लहान बालकांचा समावेश असून जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवगाव फाटा ते नैताळे रोडवर रुई शिवारात महिंद्रा पिक अप गाडी क्रमांक एम एच १५ ए यु २११९ ही देवगाव कडून रुई गावाकडे जात असताना त्याच दरम्यान रुई गावकडून देवगाव कडे येणारी टीव्हीएस कंपनीची स्टार मोटर सायकल क्रमांक एम एच १५ सीए ५९४६ यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात मोटर सायकल वरील सोमनाथ वाळू पिंपळे वय ३८ मुळ रा.वळदगाव ता.येवला हल्ली रा.कतवारे वस्ती भरवस फाटा,सार्थक विष्णू पवार वय ५ रा.माळसाकोरे तालुका निफाड हल्ली रा देवगाव,गौरव बंडू पिठे वय ५ राहणार ओतूर ता.कळवण,वाळ्याबाई बंडू पिठे वय ३० रा.ओतूर ता.कळवण हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय निफाड यांच्या मार्फत पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान सोमनाथ वाळू पिंपळे हा मयत झाला असून इतर जण गंभीर जखमी आहे.सार्थक विष्णू पवार वय ५ याच्यावर खाजगी रुग्णालयात व गौरव बंडू पिठे वय ५ याच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…