काल होस्टलमध्ये आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. आमच्या होस्टेलमध्ये संपूर्ण भारताची विविधता दिसून येते. कोणी उत्तरेच्या काश्मीर मधून, तर कोणी दक्षिणेच्या केरलमधून, कोणी गुज्जु तर कोणी असामी. तर अशा या विविधतेच्या गप्पा रंगलेल्या असताना, जम्मूची एक मैत्रीण अगदी उत्साहाने म्हणाली, ऋतुजा, तू नासिक की है ना? नासिक बोले तो ग्रेप सिटी. यार एक बार आना है वहॉं. बोहोत सुना है-त्र्यंबकेश्वर, मिसल(म्हणजे आपली चुलीवरची मिसळ) और सुला वाइनयार्ड्स. तो बोल, कब बुला रही है हमे!. आणि हे ऐकून नाशिककर असल्याचा गर्व वाटला. आपले नाशिक आहेच हो भारी. अरे सॉरी, भारी नाही-जगात भारी.
म्हणजे नाशिकच्या वातावरणापासून ते नाशिकच्या लोकांपर्यंत सगळे काही कसे आल्हाददायक आहे. एकदा का कोणी नाशिकला येऊन गेले की, परत कधी येणार, याची नक्कीच ते वाट बघत असणार. नाशिक शहराला, ‘पिलग्रीम सिटी’ म्हणून ओळखले जाते. गोदावरी तीरावर स्थित नाशिक शहर चारही युगात प्रसिद्ध आहे. नाशिकला हरिहर क्षेत्र म्हणून देखील संबोधले जाते. विष्णू आणि शिव यांचा वास असलेले हे शहर श्रीरामाच्या पदकमलांनी पावन झालेले आहे. यच्चयावत हिंदू संस्कृतीचे ऐतिहासिक वैभव, नाशिकमधील विशिष्ट शैलीच्या राम मंदिरांमधून दिसून येते. काळाराम मंदिर ज्या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणी आधी एक लाकडी बांधकामाचे मंदिर होते, जिथे समर्थ रामदास यांनी श्रीरामाची उपासना केली. काळाराम मंदिर हे हेमाडपंथी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण बांधकाम दगडी असून, गाभार्यात दर्शनासाठी गेल्यावर भक्तिभावाने मन भारावून जाते आणि आल्हाददायक असा तो अनुभव दिगंतर राहतो. मंदिरातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती स्वरूपातील प्रतिमा एक विशिष्ट भाव प्रकट करतात. श्रीरामाने स्वीकारलेल्या मार्गाचे अवलंब केले तर ब्रह्मानंद प्राप्त होते असे म्हणतात. त्र्यंबकेश्वर- गोदावरी नदीचा उगम होणार्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असे त्र्यंबकेश्वर वसलेले आहे. मंदिराची रचना ही काळ्या शिल्पापासून केली आहे. गर्भगृहात डोळ्याच्या आकाराचे शिवलिंग दिसुन येते. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे, लक्षपूर्वक पाहिल्यास यात आपणास तीन शिवलिंग दिसून येतात, ब्रह्म, विष्णू आणि महेश. त्र्यंबकेश्वर फक्त धार्मिक स्थळ म्हणून नव्हे तर पर्यटन स्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर चहूबाजूंनी पर्वत आहे. ब्रह्मगिरी, जे साक्षात भगवान शंकर यांचे स्वरूप मानले जाते, निलगिरी, जेथे निलंबिका देवी आणि दत्ताचे मंदिर आहे आणि गंगाद्वार अशा पर्वतांच्या मधोमध निसर्गरम्य असे त्र्यंबकेश्वर स्थित आहे. अंजनेरी- श्रीराम भक्त हनुमान याचे जन्मस्थान म्हणून अंजनेरी प्रसिद्ध आहे. अंजनीमाता या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक दूर-दुरून येत असतात. बालहनुमानाच्या करामती आणि लाडू समजून सूर्य खाण्यासाठी घेतलेले उड्डाण अंजनेरीवरून घेतले अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. हे ठिकाण आता थरारक खेळ जसे रॅपलिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले नाशिक शहर, अनेक रोजगारदेखील पर्यटनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. नवश्या गणपती, कपालेश्वर, गोराराम मंदिर, पंचवटीसारखे धार्मिक ठिकाणे नाशिक शहराच्या शांती आणि समृद्धीची ग्वाही देतात. मग इतके सारे देव जर इथे वास करतात तर नाशिक शहराला, ‘स्वर्ग’ म्हटले तर काही वावगे ठरणार नाही!
ऋतुजा अहिरे
मनमाडला बंदी असलेल्या नायलॉन मांजाने सिलेंडर वाटप करणारा तरुण जखमी मनमाड : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात…
इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डीफाटा येथील चौफुली नजीक दुचाकीहून जाणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा गाळ्यात मांजा अडकून…
सिडकोत नायलॉन मांजा ने घेतला युवकाचा बळी नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात नायलॉन…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने…
नाशिक मविप्र मॅरेथॉन-२०२५'चा विजेता ठरला मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा मागीलवर्षीच्या स्पर्धेतील विक्रम मोडीत, फूल मॅरेथॉनचे…
ऐकावे ते नवलच! 36 वर्षाच्या विवाहितेचा पंधरा वर्षाच्या मुलाला घेऊन पोबारा सिडको : विशेष प्रतिनिधी असे…