पिंपळपारावर रंगणार पाडवा पहाट

नाशिक(Nashik) : प्रतिनिधी
नाशिकच्या(Nashik) सांस्कृतिक विश्वात मानाचे स्थान असलेल्या पिंपळपारावरील पाडवा पहाट बुधवार दि.26  रोजी पहाटे 5वाजता पिंपळपार नेहरू चौक येथे रंगणार आहे. यंदा कार्यक्रमासाठी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं .मधूप मुदगल दिल्ली यांच्या गायनाची मैफल होणार आहे.त्यांना त्यांचे वडिल पं.विनयचंद्र मुदगल ,पं.जसराजची  , पं.कुमार गंधर्व यांचे शिष्यत्व आणि मार्गदर्शन लाभले.पंडितजींना तबला साथसंगत पं.शंभूनाथ भट्टाचार्य आणि संवादिनी साथ पं.अरविंद थत्ते करणार आहेत. यावेळी परंपरेनुसार  भाजप नेते विजय साने यांना सामाजिक  कार्यातील योगदानासाठी संस्कृती पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हेही वाचा : पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची  तारांबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *