नाशिक(Nashik) : प्रतिनिधी
नाशिकच्या(Nashik) सांस्कृतिक विश्वात मानाचे स्थान असलेल्या पिंपळपारावरील पाडवा पहाट बुधवार दि.26 रोजी पहाटे 5वाजता पिंपळपार नेहरू चौक येथे रंगणार आहे. यंदा कार्यक्रमासाठी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पद्मश्री पं .मधूप मुदगल दिल्ली यांच्या गायनाची मैफल होणार आहे.त्यांना त्यांचे वडिल पं.विनयचंद्र मुदगल ,पं.जसराजची , पं.कुमार गंधर्व यांचे शिष्यत्व आणि मार्गदर्शन लाभले.पंडितजींना तबला साथसंगत पं.शंभूनाथ भट्टाचार्य आणि संवादिनी साथ पं.अरविंद थत्ते करणार आहेत. यावेळी परंपरेनुसार भाजप नेते विजय साने यांना सामाजिक कार्यातील योगदानासाठी संस्कृती पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही वाचा : पावसामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…