पिंपळस रामाचे येथे ट्रक नाल्यात कोसळला,चालक गंभीर जखमी
लासलगाव प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील पिंपळस रामाचे येथे पुलाचा कठडा तोडून कापसाने भरलेला ट्रक नाल्यात कोसळल्याची घटना घडली.या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
याबाबत प्रत्यक्ष दर्शी कडून मिळालेल्या माहितीनुसार
शनिवारी रात्री आठच्या सुमारास गुजरात राज्यातील लाल रंगाचा आयशर ट्रक छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होता.ट्रक चालकास पिंपळस गावाजवळील रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने पुलाचा कठडा तोडून सदर ट्रक खाली नाल्या मध्ये कोसळला.
या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने निफाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या ठिकाणी रस्त्यावर असलेल्या जीवघेण्या वळणामुळे आणि रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या वाहनांच्या तीव्र प्रखर प्रकाश झोतामुळे वारंवार अपघात घडत असतात असे या ठिकाणच्या नागरिकांचे म्हणणे आहे.