सद्य परिस्थितीवर मार्मिक भाष्य शक्ती शिवाचा तेजोगोला

नाशिक: प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल रविवार  (दि.4) रोजी शक्ती शिवाचा तेजोगोल ही नेताजी भोईर लिखित व वरूण भोईर  दिग्दर्शित आणि विजय नाट्यमंडळाच्यावतीने   नाट्यकृती सादर करण्यात आली.एक पौराणिक नाट्यकृती असून सद्य सामाजिक परिस्थितीला उद्देशून राज्यकर्ते जनता आणि दुष्ट शक्ती यांची प्रतीकात्मकता पौराणिक विषयातून नाट्यकृती प्रकटीकरण केले आहे.इंद्र-राज्यकर्ते, नारदमुनी जनता, तारकासुर अतिरेकी शक्ती, अशा व्यक्तीमात्वाची गुंफण  लेखनातून सुंदर पद्धतीने केली आहे. तारकासुरा सारख्या जन्माला येणाऱ्या अतिरेकी शक्तींना रोखणे आणि प्रतिकार करणे अथवा जन्मालाच न येऊ देणे या साठी इंद्राची झालेली हतबलता, शिवशंकरांनी धारण केलेला क्रोधी स्वभाव, पुत्र कार्तिकय वा लांबविलेला जन्म तर नारादमुनीने केलेली चातुर्य मध्यस्थी यांचा सुंदर मिलाप म्हणजे शक्ती शिवाचा तेजोगोल हे नाटक.

अहंकाराने तारकासुर मातल्या नंतर त्याचा वध करण्यासाठी जन्माला येणाऱ्या शिवपार्वती पुत्र षडानन कार्तिकेय स्वामीची जन्मकथा आहे.नाटकाचे नेपथ्य किरण भोईर, संगीत वरुण भोईर, प्रकाशयोजना चेतन्य गायधनी, रंगभूषा सुरेश भोईर, माणिक कानडे, वेशभूषा संजय जरीवाला, संगीता भोईर, नृत्य दिग्दर्शक रोहित अशोक जन्जाळे ,सहप्रकाश ध्वनी सहाय्य नितेश विश्वकर्मा, जितेश दवें,रंगमंच व्यवस्था सुनंदा रायते, नामदेवराव ओहोळ, प्रेरणा देशपांडे, विकेश ससाणे यानी केले. नाटकात   दिनेश जोशी,स्वप्ना विंगळे, रुद्र ओहोळ, अभिजित काळे, किरण भोईर,विलास गायकवाड,सुरभी सोनार भोईर, अमोल थोरात,स्नेहा संगीता अविनाश, संकेत पगारे , पुष्कराज भोईर,अजय जाधव, निलेश ओहोळ, मुस्कान सोनी,कृतिका पूर्वा शिंदे, दिशा पटेल, मानसी गायकवाड, उत्कर्षा घोडके, श्रेया रुईकर, पूजा कुलकर्णी यांनी अभिनय केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *