उत्तर महाराष्ट्र

गोरक्षकांच्या माहितीवरून बेकायदेशीर गोवंश वाहतुकीबाबत पोलिसांची कारवाई

लासलगाव प्रतिनिधी

12 जानेवारी रोजी पहाटे व संध्याकाळच्या सुमारास पाटणे फाटा व शेंदुर्णी फाटा या ठिकाणी गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नाशिक ग्रामीण, पोलीस अधीक्षक,शहाजी उमाप व अप्पर पोलीस अधीक्षक,अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार तालुका पोलिसांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईंमध्ये मालेगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करत असलेल्या एकूण 14 गाय गोवंशाचे प्राण वाचवण्यात यश आले असून एकूण सात आरोपींवर पोलिसांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण रु.6,56,00/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेमध्ये 12 जानेवारी रोजी पहाटे 01:30 वाजेचे सुमारास गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, विलास जगताप यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती दिली की, एम एच 09 बी सी 1319 या सफ़ेद रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनातून सात गाय गोवंशाची नाशिक गावाकडून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार तालुका पोलीस स्टेशनचे पीएसआय मोहित मोरे, गोरख आहेर, सचिन गायकवाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर पाटणे फाटा येथे थांबले असता पहाटे 02:30 वाजेच्या सुमारास सदर वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने चालू वाहनातून खाली उतरून वाहन हॉटेल सुखसागर येथील झाडाला ठोस मारून वाहनाचे नुकसान केले. यावेळी अंधाराचा फायदा घेत वाहनचालक व त्याचा एक साथीदार पळून गेला तर एक इसम पोलिसांना वाहनात मिळून आला. सदर इसमास विचारपूस केली असता, त्याने सदर गोवंश मालेगाव येथे आरिफ खान फैजुला खान या कसाई कडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पोलिसांनी वाहनांमध्ये बघितले असता, पाच गाई व चार गोऱ्हे असे एकूण नऊ गोवंश पाय तोंड दोरीने घट्ट बांधून, निर्दयतेने, कोंबलेल्या अवस्थेत, जखमी करून कत्तलीसाठी वाहतूक करून असताना दिसून आल्याने पोलिसांना मिळालेल्या माहितीची खात्री झाली.

तर दुसऱ्या घटनेमध्ये 12 जानेवारी रोजी सायंकाळी 07:30 वाजेचे सुमारास गोरक्षक मच्छिंद्र शिर्के, भुरा सूर्यवंशी, विलास जगताप यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना माहिती दिली की, एम एच 04 डी एस 24 61 या सफ़ेद रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनातून पाच गाय गोवंशाची चाळीसगाव गावाकडून मालेगावच्या दिशेने कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीचे आधारे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या आदेशानुसार तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी प्रल्हाद देवरे, शिरोळे, शिंदे, बागुल शेंदुर्णी फाटा येथे थांबले असता सायंकाळी 08:30 वाजेच्या सुमारास सदर वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेला तर त्याचा एक साथीदार पोलिसांना मिळून आला. यावेळी वाहन चालकाच्या साथीदाराला विचारपूस केली असता, सदर जनावरे मालेगाव येथे बबलू कुरेशी या कसाईकडे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पोलिसांनी वाहनांमध्ये बघितले असता तीन गाय व दोन गोऱ्हे असे एकूण पाच गोवंश पाय तोंड दोरीने घट्ट बांधून, निर्दयतेने, कोंबलेल्या अवस्थेत, जखमी करून कत्तलीसाठी वाहतूक करून असताना दिसून आल्याने पोलिसांना मिळालेल्या माहितीची खात्री झाली.

त्यानुसार पाटणे फाटा व शेंदुर्णी फाटा येथील घटनेमध्ये तालुका पोलिस ठाण्यात अनुक्रमे गु.र.नं. 20 व 23/2023 प्रमाणे आरोपी असलम शेख हार कुरेशी, आरिफ खान पैजउल्ला खान, (दोघे रा. मोमीनपुरा, मालेगाव) व वाहन चालक आयुब आणि त्याचा साथीदार शोएब (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) आणि शेख अल्ताफ शेख रशीद, रा. पिलखोड तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव वाहन चालक नफीस टाकल्या, बबलू कुरेशी (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांचे विरुद्ध पोलीस शिपाई गोरख छबु आहेर व हेमंत प्रल्हाद देवरे यांच्या फिर्यादी नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 अ, 9, 11 सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याबाबत प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11, 4 व मोटर वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 181, 3 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटणे फाटा येथील गुन्ह्यामध्ये रू.66,000/- किमतीची गोवंश जनावरे व रु.2,50,000/- किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा रु.3,16,000/- किमतीचा मुद्देमाल आणि शेंदुर्णी फाटा येथील गुन्ह्यामध्ये रू.70,000/- किमतीची गोवंश जनावरे व 2,70,000/- किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा रू 3,40,000/- किमतीचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन दादाजी गायकवाड करीत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

23 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago