देवळा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत ३ टॅक्टर केले हस्तगत,
साहाय्यक पोलिस निरिक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांची विशेष कामगीरी
देवळा : प्रतिनिधी
लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर मंगळवारी (दि १७) रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत . सपोनि पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या या दमदार कामगिरीने अवैद्य रित्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. सदर कारवाइची माहिती पोलीस अधीक्षक शहाजी उमाप ,अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार -कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांना देण्यात येऊन पुढील कारवाई तहसीलदार विजय सूर्यवंशी करीत आहेत. याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दि १७ रोजी तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर रात्री 2 ते 3 वाजेच्या दरम्यान पकडण्यात येऊन ते ,देवळा पोलीस स्टेशन आवारात जमा करण्यात आले आहेत.लोहोणेर गिरणा नदीपात्रातुन अवैध रित्या वाळू वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी लोहणेर माळवाडी रस्त्यावर सापळा रचुन त्यांना 3 ट्रॅक्टर मधून गौणखनिज ( वाळु ) अवैध रित्या वाहतुक करतांना मिळुन आले.यावेळी पोलिसांना चालकांकडे कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना आढवुन आला नाही.यावरून सदर ट्रॅक्टर पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करुन मालक व चालकाचे नाव पत्ता घेवुन चालकांना सोडून देण्यात आले आहे . अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत .पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य व्यवसायांना चाप बसविला आहे . या धकड मोहीमचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, कारवाई अशीच सुरू ठेवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…
जिल्ह्यातील नऊ धरणांतून विसर्ग सुरू नाशिक : प्रतिनिधी शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनमानी करत अनेक देशांवर जबर आयातशुल्क लादले. विशेषतः चीनवर जबर…