अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांचा छापा
लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव शहरातील संजय नगर परिसरातील अवैध दारूविक्री अड्ड्यावर छापा टाकून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून विनापरवाना अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती स पो नि राहुल वाघ यांनी दिली आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार लासलगाव पोलिस ठाण्याचे
महिला पोलिस कर्मचारी उषा त्र्यंबक आहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फरीदा रहीम शेख वय ४० वर्ष,रा.संजयनगर लासलगाव ता.निफाड ही महिला संजय नगर परिसरात सार्वजनिक शौचालयाचे आडोशाला अवैध रित्या दारू विक्री करत असल्याची माहिती लासलगाव पोलिसांना मिळाली त्या वरून शनिवारी दुपारी पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून १४०० रुपये किमतीच्या अवैध दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या असून सदर महिलेवर बेकायदेशीर रित्या अवैध दारू विक्री करणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई स पो नि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोलिस कर्मचारी उषा आहेर,पो कॉ प्रदीप अजगे,पो ना.कैलास महाजन,सुजय बारगळ,सागर आरोटे यांनी केली आहे
पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…
देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…
गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…
बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…
वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…