मैदानी चाचण्यांत तरूणांची दमछाक
नाशिक : प्रतिनिधी
ग्रामीण भागातून आलेल्या तरूणींच्या जिद्दीचे पोलीस मुख्यालय मैदानात दर्शन, थंडी आणि ऊनाचा सामना करत केली जात आहे पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रीया पूर्ण.!
ग्रामीण पोलीस अधिक्षक मुख्यालय मैदानात सोमवारपासून (दि.2) पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी प्रीक्रयेला प्रारंभ झाला. दोन दिवस वाहन चालक पदासाठी मैदानी चाचणी प्रक्रीया पार पडली. पहिल्या दिवशी 550 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहे. तर कालही मंगळवार (दि.3) रोजी मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. आज (दि.4) बुधवारपासून पोलीस शिपाई पदासाठी मैदाणी चाचणीला प्रारंभ होणार आहे..
नाशिकसह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, शिंदखेडा, साक्री, चाळीसगाव, भुसावळ, मालेगावसह नाशिक जिल्हयातून तरूण पोलीस भरती प्रक्रीयेसाठी तरूण तरूणी आले आहेत. चालक पदाच्या 15 हजार जागांसाठी ऑनलाईन 2 हजार 100 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे.
वाहनचालक पदासाठी उमेदवारांना 1600 मीटर धावावे लागते. तसेच गोळाफेक यात उमेदवारांची शारीरिक क्षमता पाहिली जाते. मात्र 1600 मीटरचा टप्पा पार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत होत असल्याचे चित्र होते.
मुख्यालय मैदानात फोटो आणि झेरॉक्सची सोय
ग्रामीण पोलीस अधीक्षक मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आदिवासी व ग्रामीण भागातून तरूण तरूणी आले आहेत. मात्र ऐनवेळी कागदपत्राची पूर्तता करताना फोटो आणि झेरॉक्स अभावी तरूणांची तारांबळ उडते आण्णि गैरसोय होते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी मैदानावरच झेरॉक्स आणि फोटो काढून देण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याठिकाणी झेरॉक्स आणि फोटोसाठी तरूणांची रांग लागत आहे.