नाशिक

पोलीस भरती प्रक्रिया सुरू

 

मैदानी चाचण्यांत तरूणांची दमछाक

नाशिक : प्रतिनिधी

ग्रामीण भागातून आलेल्या तरूणींच्या जिद्दीचे पोलीस मुख्यालय मैदानात दर्शन, थंडी आणि ऊनाचा सामना करत केली जात आहे पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रक्रीया पूर्ण.!

ग्रामीण पोलीस अधिक्षक मुख्यालय मैदानात  सोमवारपासून (दि.2) पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी प्रीक्रयेला प्रारंभ झाला. दोन दिवस  वाहन चालक पदासाठी मैदानी चाचणी प्रक्रीया पार पडली. पहिल्या दिवशी 550 उमेदवारांनी  मैदानी चाचणी दिली आहे. तर कालही मंगळवार  (दि.3) रोजी मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली. आज (दि.4) बुधवारपासून  पोलीस शिपाई पदासाठी मैदाणी चाचणीला प्रारंभ होणार आहे..

नाशिकसह नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, शिंदखेडा, साक्री, चाळीसगाव, भुसावळ, मालेगावसह नाशिक जिल्हयातून तरूण पोलीस भरती प्रक्रीयेसाठी तरूण तरूणी आले आहेत.  चालक पदाच्या 15 हजार  जागांसाठी ऑनलाईन 2 हजार 100 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे.

वाहनचालक पदासाठी उमेदवारांना 1600 मीटर धावावे लागते. तसेच गोळाफेक यात उमेदवारांची शारीरिक क्षमता पाहिली जाते.  मात्र 1600 मीटरचा टप्पा पार करताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत होत असल्याचे चित्र होते.

 

मुख्यालय मैदानात फोटो आणि झेरॉक्सची सोय

ग्रामीण पोलीस अधीक्षक मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे.  यासाठी आदिवासी व ग्रामीण भागातून तरूण तरूणी आले आहेत.  मात्र ऐनवेळी कागदपत्राची पूर्तता करताना  फोटो आणि झेरॉक्स अभावी तरूणांची तारांबळ उडते आण्णि गैरसोय होते.  त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस अधिक्षक  शहाजी उमाप यांनी मैदानावरच झेरॉक्स आणि फोटो काढून देण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने  भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याठिकाणी झेरॉक्स आणि फोटोसाठी  तरूणांची रांग लागत आहे.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

6 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

10 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

11 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

11 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

11 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

12 hours ago