नाशकात संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांचा वॉच

हॉटेल्स, लॉजमधील व्यक्तींची घेतली जातेय माहिती

नाशिक : प्रतिनिधी
एअरस्ट्राइकनंतर देशभरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. देवळाली कॅम्पमधील आर्टिलरी सेंटर, नोट प्रेस, एचएएल तसेच शहरातील धार्मिक स्थळांभोवती सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. बंदोबस्त वाढवून नियमित गस्त वाढवण्यात आली आहे.
हॉटेल्स, लॉज, धर्मशाळांमध्ये थांबणार्‍यांची तपासणी केली जात आहे. श्वानपथकाद्वारे गर्दीच्या ठिकाणी तपास सुरू आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसह नव्याने आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.
भारताने दहशतवादास उत्तर देताना पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी स्थळांवर हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात गोळीबार केले, तसेच भारताच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले. भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले केले. या घटनांनी दोन्ही देशांमध्ये सतर्कता आहे.
नाशिक शहरात ओझर येथे हिंदुस्थान एरोनॉटक्सि लिमिटेड (एचएएल)मध्ये लढाऊ विमानांची निर्मिती होते. देवळाली कॅम्प येथे स्कूल ऑॅफ आर्टिलरी सेंटर असून, त्र्यंबकरोडवर महाराष्ट्र पोलिस अकादमीसह इतर महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणाही सतर्क असून, खबरदारी घेतली जात आहे.
शहरातील संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा यांची नियमित तपासणी करीत थांबणार्‍या नागरिकांची माहिती घेतली जात आहे. तसेच गस्त वाढविण्यात आली असून, बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वानपथकामार्फत गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा, महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर नियमित तपासणी केली जात आहे.

संवेदनशील ठिकाणांवर ‘नो फ्लाय झोन’

शहरातील संवेदनशील ठिकाणांवर 13 मेपासून ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ घोषित केला आहे. त्यामुळे या ठिकाणांवर ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉटएअर बलून, एअरक्राफ्ट आदी हवेत उडवल्या जाणार्‍या मानवरहित साधनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणांसह त्याच्या दोन किलोमीटर परिसरात मानवरहित साधने उडवण्यास बंदी आहे. तसेच शहराच्या इतर भागांत हवाई क्षेत्रात मानवरहित साधणे उडवण्यासाठी पोलिसांकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

ही आहेत संवेदनशील ठिकाणे

* आर्टिलरी, देवळाली कॅम्प* इंडिया सिक्युरिटी प्रेस,
* करन्सी नोट प्रेस, जेलरोड * एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, एकलहरे * शासकीय मुद्रणालय, गांधीनगर * एअरफोर्स स्टेशन, बोरगड व देवळाली * कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल, गांधीनगर * नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह *श्री काळाराम मंदिर, पंचवटी * महाराष्ट्र पोलिस अकादमी, त्र्यंबकरोड * आकाशवाणी केंद्र, गंगापूर रोड * पोलिस मुख्यालय व पोलिस आयुक्त कार्यालय, गंगापूर रोड * जिल्हाधिकारी कार्यालय * जिल्हा व सत्र न्यायालय * जिल्हा शासकीय रुग्णालय * नाशिकरोड व देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक * महापालिका जलशुद्धीकरण केंद्रे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *