तीन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड; इच्छुकांची नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षपदासह तीन स्वीकृत नगरसेवकपदांची निवड बुधवारी (दि. 14) सकाळी 10 वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात होणार आहे. पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची सर्वसाधारण सभा होणार आहे.
स्वीकृतसाठीही जोरदार मोर्चेबांधणी
स्वीकृत सदस्यपदासाठी आमदार माणिकराव कोकाटे गटाकडून जयश्री पवार, विजय वरंदळ, सुनील गवळी, पीयूष लोया, सुभाष कुंभार यांच्यासह आणखी काही नावे चर्चेत आहेत. खासदार राजाभाऊ वाजे गटाकडून अशोक जाधव, पिराजी पवार यांपैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य, या सूत्रानुसार वाजे, कोकाटे गटापैकी कोणत्या गटाला दोन स्वीकृत सदस्यत्व मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे, स्वीकृत सदस्यपदही सहा महिने किंवा एक वर्षासाठीच देण्यासंदर्भात दोन्ही गटांकडून चर्चा सुरू आहे. या नव्या फार्म्युल्यामुळे पाच वर्षांत बहुतेकांना खूश करण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून झाल्यास नवल वाटायला नको.
सिन्नर नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष व 30 नगरसेवकांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विठ्ठलराजे उगले नगराध्यक्षपदी विजयी झाले. नगरसेवकांच्या संख्याबळात उद्धवसेनेचे 14, राष्ट्रवादी (अजित पवार)चे 13, भाजपचे दोन, तर शिंदेसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे.
उद्धवसेनेकडे 14, तर राष्ट्रवादी (अजित पवार)कडे नगराध्यक्षांसह 13 नगरसेवक मिळून एकूण 14 मते असल्याने उपनगराध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. भाजपचे दोन व शिंदेसेनेचा एक नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार असल्याने ही निवडणूक थेट लढतीतून होणार की राजकीय ‘समजुतीतून’ मार्ग निघणार, याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले आहे. खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे गटात हालचालींना वेग आला आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी कोकाटे गटाकडून हर्षद देशमुख, गीता वरंदळ, शेखर गोळेसर यांच्यासह काही नगरसेवक इच्छुक आहेत. वाजे गटाकडून पंकज मोरे, उदय गोळेसर यांची नावे आघाडीवर आहेत. उपनगराध्यक्षपदासाठी येत्या बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुख्याधिकार्यांकडे नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. दुपारी 12 ते 12.15 दरम्यान छाननी, 12.15 ते 12.30 या वेळेत माघार, तर 12.30 ते 1 या वेळेत उपनगराध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे.
दरम्यान, तीन स्वीकृत नगरसेवकपदांसाठी मंगळवारी (दि. 13) दुपारी 12 पर्यंत संबंधित गटनेत्यांनी जिल्हाधिकार्यांकडे नामनिर्देशनपत्र सादर करणे आवश्यक आहे. बुधवारी होणार्या सभेत पीठासन अधिकारी अधिकृतपणे स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करणार आहेत.
Political fight for Sinnar deputy mayor’s post to take place on Wednesday
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…