जालना/मुंबई : प्रतिनिधी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. भगवानगडावरील दसरा मेळाव्यात जरांगे म्हणाले की, सध्या भाजपच्या नेत्यांमध्ये अशी कुजबुज सुरू आहे की, जरांगे पाटील यांना श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी रुपये पोहोचवण्यात आले आहेत. ही चर्चा भाजपचेच नेते करत आहेत. यावर शिंदे यांना सवाल करताना जरांगे म्हणाले, तुम्ही भाजपला असे सांगितले का की, तुम्ही भाजपकडून 500 कोटी घेऊन मला दिलेत? तुम्ही मला खरोखर 500 कोटी दिले का? जर दिले नसतील तर मग भाजप तुम्हाला संपवतोय का, तुम्ही मला संपवताय, याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. दरम्यान, जरांगेंच्या या टीकेला एकनाथ शिंदे यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तर रामदास कदम यांनी मात्र जरांगेंवर टीका केली आहे.
Politics heats up over Manoj Jarange’s ₹500 crore allegation