मुंजवाड ते डांगसौदाणे रस्त्याची दुरवस्था

सरपंच जाधवांसह ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

खमताणे ः प्रतिनिधी
मुंजवाड ते डांगसौंदाणे रस्त्यावर मुंजवाड गावाजवळील तीव्र वळणावर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मुंजवाडचे लोकनियुक्त सरपंच व सटाणा बाजार समितीचे उपसभापती हरी जाधव व ग्रामस्थांनी दिला आहे.
सटाणा- कंधाणे मार्गे डांगसौदाणे रस्ता तालुक्याच्या आदिवासी भागाला व कळवण तालुक्याला जोडणारा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी अवजड वाहने, दुचाकी व प्रवासी वाहनांच्या रहदारीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर मुंजवाड गावाजवळ तीव्र वळणावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचून गाळ रस्त्यावर पसरून रस्ता निसरडा झाल्याने दुचाकी घसरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्तादुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही खड्डे बुजवले जात नाहीत. दिवसेंदिवस खड्ड्यांचा आकार वाढत आहे. वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. सरपंच जाधव यांनी आमदार दिलीप बोरसे यांना साकडे घालून हा रस्ता खड्डेमुक्त, वाहतूक योग्य करावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *